पोस्ट्स

एप्रिल, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
अभिमान - गर्व - माज अमेरिकेत आल्यावर काही दिवसातच मी ऑफिसजवळ असणाऱ्या कॉलनीमध्ये राहायला गेले..  जागा माहितीची होती.. सामान ब्यागेतून काढून हळू हळू लावायचे होते.. तिथे राहायला गेल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी शनिवारी, किराणा ,भाज्या आणायला मी निघतच होते तेव्हा अचानक एक उंदराचे पिल्लू आमच्या खोलीत फिरताना दिसले.. मला हे अगदी धक्कादायक होते, मी जोरात किंचाळले.. माझ्या सोबत राहणाऱ्या मुली धावत आल्या.. त्या उंदराला त्यांनी कसे बसे खोली बाहेर काढले.. मग तो उंदीर स्वयंपाक घरात गॅसच्या खाली कुठेतरी जाऊन लपला.. नंतर मग ऑफिस मधून एक माणूस येऊन त्या उंदराला घेऊन गेला..  तेव्हा कळलं कि गॅसच्या पाईपजवळ छोटीशी फॅट होती तिथून हे उंदीर आत येतात.. त्यावेळेस सोबतच्या मुली म्हणाल्या कि १५ दिवसापूर्वीही असा उंदीर आला होता.. झालं मग मी किराणा आणायचा बेत रद्द केला.. ज्या स्वयंपाकघरात उंदरं पाळतात, तिकडे धान्य आणि अन्न कसे ठेवायचे.. मी डबा लावून टाकला, इकडे घरगुती डबा मिळतो हे आमचे भाग्य आहे.. नंतर ती फट बुजवली आणि आम्हाला वाटलं समस्या संपली.. पण काही दिवसांनी परत एक उंदीर दुसऱ्या खोलीत फिरायला ल...