पोस्ट्स

मार्च, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
जेव्हा तुम्हाला  एखादी गोष्ट पाहिजे असते तेव्हा सगळ जगच तुमच्या मदतीला ती साध्य करण्यासाठी धावून  येतं ...! कॅलिफोर्नियामध्ये येऊन काही दिवस झाले होते..  इथल्या वातावरणाशी , इथल्या लोकनाशी हळू हळू रुळत होते.. एकदा एका शनिवारी सहज काहीतरी लॅपटॉप वर बघताना चेरी ब्लॉसमचे छायाचित्र बघितले..  आणि लक्षात आले कि ही पाचवी खेप अमेरिकेची पण इथे वसंत ऋतू पहिल्यांदाच अनुभवत आहे.. हलक्या गुलाबी रंगाच्या चेरी फुललेल्या बागांचे छायाचित्रांनी मला मोहून टाकले.. लगेचच  वॉशिंग्टन  डीसीमधील  चेरी बहर उत्सवाच्या तारखा बघितल्या.. अगदी एका आठवड्यानेच तो उत्सव होता.. मग लगेच विमानाचे तिकीट बघायला सुरुवात केली.. मला शनिवार रविवारचा जमणार होते, इतक्या ऐनवेळेसचे तिकीट आणि त्यात ते चेरी बहराचे दिवस.. अतिशय महाग म्हणजे जवळ जवळ दुप्पट किमतीचे तिकीट शिल्लक होते.. पण मला आता तो चेरी बाहेर बघितल्याशिवाय चैन पडणार नाही असे वाटत होते.. त्यामुळे तिकडे संजीव आणि इकडे मी असे वेगवेगळ्या राज्यातून , वेगवगेळ्या मार्गाने जरा बजेट मध्ये तिक...
इमेज
एकाच या जन्मीं जणू फिरुनी नवी जन्मेन मी.. :) संध्याकाळ.. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझी सगळ्यात आवडती वेळ..  ऑफिसहुन संध्याकाळी साधारण ५ ते ६ च्या दरम्यान घरी चालत चालत जाते.. तेव्हा उन्ह उतरलेले असते पण सूर्यास्ताला अजून वेळ असतो.. घराच्या  दिशेने चालत जाताना मन एकदमच  निवांत होते.. ऑफिसपासून घरी चालत जायला  साधारण २५ मिनिट्स लागतात.. मी मात्र हळू हळू इकडचे तिकडचे  बघत संध्याकाळचा आनंद घेत रमत गमत जाते.. इकडे ना रहदारी ना कसले आवाज.. रस्ता अतिशय सुंदर आणि स्वच्छ.. दोन्ही बाजूला झाडं , मधून चालण्यासाठी खास रास्ता..   कधी निरभ्र आभाळ  तर कधी ढगाळ वातावरण.. जरा मोकळा परिसर असल्याने किंवा प्रदूषण नसल्याने किंवा अजून काही कारण असेल पण इकडे आकाशाचा निळा रंग फार सुरेख दिसतो.. चालत जाताना मी  कितीतरी वेळा आभाळाकडे, आजूबाजूच्या झाडांकडे  बघत  बघत जाते.. शिवाय सोबतीला सदाहरित गाणी असतात.. तो परिसर आणि ती गाणी मला एका वेगळ्याच विश्वात...